Thursday 2 March 2017

❤❤❤कॅन्सर च्या रुग्णाचा अभ्यास करून आयुर्वेदीय औषधी आणि संप्राप्ती इत्यादींचा विचार करताना "चरकस्तु चिकितसीते " चाच पुनःप्रत्यय आला , अर्बुदाची ( मासार र्बु द ,रक्तार्बुद )संप्राप्ती लावताना वातरक्ताच्या उपद्रवा मद्धे अर्बुद हा शब्द आला आहे इतकेच नव्हे तर कॅन्सर च्या आत्ययिक अवस्थेचेच वर्णन तिथे इतर लक्षणे देऊन हि आले आहे , यातील कुठलीच गोस्ट हृ दया मद्धे मूळ श्लोकी आलेली नाहीये , त्या एका सूत्र वरून वातरक्त, रक्तपित्त, विसर्प, कुष्ठ इत्यादी विकारातील निदान सेवनामधील साधर्म्य हि लक्षात आले त्याचा परिणाम म्हणून वर उल्लेखित विकारा कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि कॅन्सर च्या चिकित्सेची नवीन दालने उघडली जाऊन रुग्णांना अतिशय आणि वि सम् यकारक परिणाम दिसू लागला, आणखी "उत्खनन "करताना अस ही आढळलं कि रक्त दूषित होऊन जेव्हा मास धातूला बिघडवतो तेव्हाच अर्बुदो त्पत्ती होते , अशी ही अर्बुदे "विरेचन साध्य" आहेत ,यातून इतका दिलासा लोक मानसाला देता येतो की" दर दोन महिन्याने विरेचन उपक्रम आणि शरदात रक्तमोक्षण करीत जा" कि या आजाराची संप्राप्ती घडणारच नाही ,आणि गेली 20 वर्षे याचा प्रयोग अने क रुग्णावर केल्यावर असं दिसतंय कि ओपेशन करून आलेल्या रुग्णांना या विचाराने ट्रीटमेंट दिल्यावर 100 पैकी 90 वेळा त्यांना कॅन्सर रेलैप्स होत नाही,  आता याच डॉक्युमेंटशन हि सुरु केलं आहे, याही पेक्षा प्रचंड आनंद देऊन गेलेली गोस्ट तर चरकाचार्यां विषयी चा आदर आणखीनच वाढविते ,अर्बुदा मद्धे विरेचन वापरा हा चरकादेश आल्यावर " हरितकी पंचरसा अ लवणा तुवरा परम ,,, श्लोक आठवला आणि मनी विचार केला की हे कॅन्सर चे लोक खूप मीठ खातात आणि सांगून हि मीठ बंद करीत नाहीत , तर लवण रहितं पंचरसाची हरितकी दिल्यास त्या रुग्णाच्या शरीरात षडरस होतील आणि " सर्व रसाभ्यासह् बल वर्ण करा नाम श्रेष्ठह "असे घडेल ,आणि विचारला पुष्टी मिळावी म्हणून चरक अर्श रोग चिकित्साध्याय काढून अभ यारीस्ट काढून पाहिल त्यात चरकानी अर्बुदाचा स्पस्ट उल्लेख केला आहे इतकच नाही तर अर्श आणि म्हणून अर्बुद साठी त्याचा " नित्य अभ्यास/ सेवन हि सांगितलं आहे , हे फक्त आणि फक्त चरकच करू शकतात, या विचारांनी किती लोकाचे जीव वाचले आहेत याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो, किडनी failure च्या संबंधाने आलेला अनुभवही असाच सघन आहे, मूत्राच्या विवर्णतेचा उल्लेख हृदया मद्धे कास रोग अध्यायात आला आहे जो कि अनाठायी वाटतो परंतु श्वासाच्या वेगावस्थेत आयुर्वेदीय, allopathic, होमिओपॅथिक, कोणतेही meds दिले तरी मूत्रोत्पत्ती जास्तीची होऊन दम्याचा वेग कमी होतो, तसेच अपघातात छातीला मार लागून मेलेले रुग्ण रक्ताची मूत्र प्रवृत्ती होऊनच मरतात हे प्रत्यक्ष सत्य आहे त्या मुळे कास,श्वास आणि क्लेद मूत्र आदीचा संबंध स्पस्ट होतो,हृदया मद्धे तिथे ताडगोळ्याचं आणि भुई कोहल्याच तूप कास आणि मूत्र विवर्णता एकत्र असल्यास वापरण्यास सांगितलं आहे,म्हाताऱ्या माणसांना( 60 +) खूप दिवसाचा कास असताना मूत्र परीक्षण केल्यास खूपच pus सेल्स आढळतात ,इतर काहीच लक्षण नसतात अश्या वेळी हि तुपे सद्यह गुण देतात, तर हाच विषय चरकात मांडलेला पाहिल्यास त्यात कदंब फळाचे घृत हि वापरण्यास सांगितलं आहे, वाग्भटाचार्यांना ग्रंथ पद्यात लिहिताना कदाचित अडचण आली असेल काय म्हणून हे द्रव्य वगळले असेल? का " नातीसंक्षेप विस्तारम"असेल? काहीही असो पण हृद्रोग,किडनी failure, आणि मूत्र विवर्णता असताना केवळ आणि केवळ कदंब सिद्ध घृतच उपयोगी पडते हे हि दुर्लक्षित करता येत नाही, हे तूप शोधायला आपल्याला कदाचित आयुष्य खर्च कराव लागलं असत आणि तरीही ते जमल असत का नाही माहित नाही ! त्या मुळे चरकच नव्हेत प्रत्येक ग्रंथच अगदी बाड हि महत्वाची आहेत, अमल वेतस म्हणून बिलकुल आंबट न लागणार जे घाणेरडे द्रव्य " बनिये" विकतात त्या ऐवजी महाराष्ट्रीय वैद्यांनी कोकम,रातांबा,आमसुल वापरावा हा आदेश बाडांचाच आहे की जो तीथे नक्की ,हुकमी गुण देतो( गुद गत परिकर्तिकेची ज्वरपेया अमल वेतस घालून देणे , गुद मार्गातील स्वेदाचाक्षय मानून स्फुटनं त्वचा= परिकार्तिका) हृद याचा विषय चालला य पण न राह् हुन लिहिलं गेलं कारण फक्त वाग्भट असं नको ना सगळेच जण हवेत वाटू लागलं आणि म्हणून लिहून काढलं ,दुसऱ्या ग्रुप साठी लिहिलेली पोस्ट❤❤❤

by ,.
गुरुवर्य जमदग्नि सर
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌷🌹

Friday 10 February 2017

Hair fall and ayurved

🌹🌹🌹केसांच्या तक्रारी मद्धे रक्त,अस्थीआणि मज्जा धातू वात आणि पित्त दोष,पुरि्ष आणि स्वेद या मलाचा चिकित्से साठी विचार करावा लागतो त्या खालो खाल विष सेवनाचा विचार करावा लागतो(रोमशात हे लक्षण विष सेवनात आढळते,दूषित समुद्र जल स्नान,मासे खाण केमोे या मुळे केस गळतात एलोपेशिया टोट्यालीस उत्पन्न होतो) अतिचिंता,अतिक्रोध,तणाव,थायरॉईड,pcod, कामला,पांडू,ग्रहणी, अस्थिमज्जागत ज्वर,टायफॉईड,प्रवाहिका, क्रोम्स disease, रक्तज प्रवाहिका,अति तीक्ष्ण उष्ण अन्न, आतप सेवन, शुक्रक्षय,अनुवंशिकता,डोक्यावरून भर वाहणे गरम पाणी टाकणे,क्षार सेवन,कास etc कारण नुसार चिकित्सा करावी ,वामन,रक्त मोक्षण, विरेचन ,लेप, बस्ती,नस्य,मुखलेप, गंधक सेवन ,लोह भसम सेवन याचा चिकित्सेत वापर करावा ,                 केस दुभंगणे हे लक्षण स्त्रियांच्यात केस कात्रीने कापणे,वातव्याधी,( भंग) या मुळे येते तिथे वाताचे उपक्रम उपयोगी पडतात,केस मुळाशी दुखणे या मद्धे वातरक्ताची चिकित्सा करावी लागते, शुक्राक्षय, कास, राज यक्षमा, यांची treat रसायन सेवनासह ,खाली त्य, पाली त्य यात उपयोगी पडते,ग्रंथ मद्धे माक्या पेक्षा असन जास्ती वेळा केसांसाठी वापरला गेला आहे,सर्व केसांचे तक्रारीसाठीचा एक टेस्टड योग्य उद्या लिहून पाठवतो त्याचा सर्वांनी जरूर वापर करून पाहावा, बृ ह द त्र यीच्या अभ्यासातून प्राधान्याने तो योग्य तयार केला असून त्याचे पथ्यापथ्य हि पाठवीत आहे,बस थोडी वाट पहा,🌹🌹🌹

by..
वैद्यराज समिर जमदग्नी सर
🙏🏻🙏🏻

Saturday 21 January 2017

Pcod and ayurved vichar by jamadagni sir

🌹🌹🌹pcod चा असा वेगळा विचार नसावा, निदान आयुर्वेदीय असावे ,साक्षात गर्भाशयाचाच तात्काळ विचार करून आपण खूप पंचाईत करून घेतो, ,"अष्ट वर्षात भवेत गौरी नव वर्षात तू रोहिणी दश वर्षात भवेत कन्या अत ऊर्ध्व रज स्वला ," म्हणून रजस्वला अवस्थे पूर्वीचे आमाशय चे शारीर( रचना आणि क्रिया) यातील व्याधी आणि विकृती यांचा पथ्य सह विचार करावा , त्या मुळे ज्वर,अमल पित्त, पित्तवृत्त वात, पांडू( वात कफज) ,आमाशय गत विषे,छरदी,इत्यादी होऊन गेले/ असलेले विकार रस आणि म्हणून रजाला विकृत करत असतात ,यासहच पक्वशय गत वात , प्रवाहिका,उदावर्त,अर्श, कृमी,ग्रहणी इत्यादींचे विकार लक्षात घ्यावे लागतात, ग्रहणीतील स्त्री विषयक अप्रहर्षण स्त्री च्या बाबतीत हि पुरुष विषयक अप्रहर्षण ( अर्थापत्ती) असे घेतल्यास गर्भाशयाशी संबंधित अनेक विकारांची उकल चुटकी सरशी ग्रहणीत meds वापरून होते या नंतर रजोदुष्टी चा विचार करावा या मधील श्लेष्म वाताभ्याम ग्रंथी संनिभम येथे "रजातील गाठी,,"चे वर्णन आहे, ," जो भाव पदार्थ ज्या स्टोतासातून वाहतो त्या भगवं पदार्थातूनच त्या स्रोतासाची उत्पत्ती होते या न्यायाने बीज ग्रंथीं ची उत्पत्ती हि राजातून असल्याने ग्रंथी राजाचे meds pcod साठी उपयोगी आहे,(रजाचे प्रत्यक्ष परीक्षण पुरुष वैद्याने हि करणे गरजेचे आहे तो एन्ड प्रॉडक्ट असल्याने त्याचे निदान करून treat दिल्यास रस आदी धातू आणि मनोदेशापर्यंत मूलगामी छान परिणाम येतात) ,या नंतर मनोबगाव आणि रस धातू चा विचार एकत्र करून ( रस क्षयातील शब्दासहिष्णुंता = मनाशी संबंधित लक्षण) स्त्रीच्या मानसिक आजार अवस्था ,आदींचा विवंगर करून मनोरोगातील मेडशी वापरावीत, या नंतर योनी रोगात उप प्लु ता आदी योनी रोगात योनीला सूज येते असे वर्णन असते अश्या वेळी योनी = vagina असा अर्थ न कळत घेतला जाऊन अनर्थ होतो  योनी = त्र्या वर्त योनी असा अर्थ सार्थ आहे ,त्यात योनीला सूज= बीज ग्रंथिनाही सूज असा अर्थ घेतल्यास उप प्लुता आदी योनी रोगांच्या treat ने pcod,fibroids का जातात ते स्पस्ट  होते, या बरोबरच स्त्री याच नवस बोलण( प्राधान्यानं गणपतीला) आणि ते न फेडणे) या मुळे मूलाधार चक्र उत्तेजित होऊन गर्भशाय बस्ती गुद आदींचे विकार उत्पन्न होतात ,अश्या स्त्रियांचे ष स श व हे शब्द हि विकृत पद्धतीने उच्चरले जातात त्या मुळे त्यांच्या बोलांत वरूनही त्याच्या आजाराचे निदान होऊ शकते, रजस्वला परिचर्या न पाळल्याने गर्भाशय व्रणी त असल्याने त्याच्यात विकृती येऊन बीजग्रंथींचे रि दम जाऊन pcod आणि इतर गर्भाशयाचे विकार मनोरोगासह होतात यासहच गर्भिणी ,सूतिका परिचर्या न पालण, दिनचर्या, ऋतूंचर्या,रात्रीचर्या न पालन यामुलेही pcod ,गर्भाशय विकार उत्पन्न होतात , कारण नुसार पथ्य पालन ,निदान वर्जन,पंच कर्म,रस औषधी, वनस्पतिज नि प्राणिज meds etc वापरावीत ,तसेच विंचू, मध माशी,गांधील माशी, सर्प, ढेकूण, डास, उंदीर, चिचुंद्री etc चावले असल्यास त्याचा हि विचार व्हावा कारण कलेचे क्रामण करीत हि विषे आमाशय, पित्त धरा, पक्वषय, अस्थी धरा, शुक्र, ओज यांनाही डस्ट करताततरीही1) शतावरी, गुडूची सत्व, शंख 2) त्रिभुवन कीर्ती तुळस रस3) दश मूळ काढा पिंपळी मध4)  त्रिकटू, गोक्षुर पाठा, कुटज5) पोटाला बिल्व बीज बंदर पत्र लेप6) पोटाला पत्र पोटातली शेक7) रौद्र रस7) कंचनार गुगुळ8) उपोदिकेची भाजी9) विदा रि ,रान कांदा,पुनर्नवा,वचा ,शतावरी10)दशमूल सहचरादी तेलाचे निरुह अनुवंसं कर्म बस्ती11)  आर्द्रक सिद्ध घृताचे नस्य12) ज्योतिष्मांन रस 13) चंपक दि अगद, दुष्टी विषारी अगद, चंद्रोदय अगद, महा हस्ती गंध अगद ,अजित अगद, पद्मक अगद14)कपाल भाती, ओंकार ,अनुलोमविलोम प्राणायाम etc चा व्याधी प्रत्यनिक म्हणून दोषादी च्या अवस्थांचा विचार करून उपयोग होतोच, गुरुवर्य बागेवडीकर,विलासजी नानल,कोल्हटकर सरांनी जे बीज पेरले नि वाढवले त्यातून यश देणारे जे विचार स्फुरले ते लिहिले आहेत काही चुकलं असेल तर माफी असावी 🌹🌹🌹

by..

वैद्यराज जमदग्नी सर

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Wednesday 18 January 2017

Thoughts by Vaidya .jamadagni sir


पुरीषच्या अवरोध लक्षणांत प्रति श्याय हे लक्षण आहे कुटज पक्वशयातील सामाता घालून निराम मलास बाहेर काढून प्रति श्याय कमी करते या सहच यकृ तास  उत्तेजना देऊन मांस धत्वाग्नि वर्धन करते , मांसाचा मल म्हणजे नाकातील शेंबूड आहे ( या ठिकाणी निंब पटो ल त्रि फाला मृदविका मुस्त " वत्स कौ" हे महत्त्वाचं आहे) या प्रकारेचं इतर meds काम करतील, कुटज वत्सक हे उर शूळासाठीही उपयुक्त आणि जास्त वेळा ग्रंथात येते,मेंदूत वाढणारे csf हे कोराइड प्ले क्सेस मधून मेंदूतील ventricles मधून स्रवते या रचना रक्त आणि मज्जे पासून बनतात हे रक्त( आणि पित्त हि) मज्जा धातू ग्रहणीत तयार होतो याच ठिकाणी दोषवह,स्वेद वह आणि " अंबु वह स्रो तस आहेत म्हणून उदरातीळ मेडशी आणि विरेचनदींचा फायदा जाळशीर्षात होतो मुख आणि गुद यांच्या पासून साधारण 1 ते 1,5 विता चा अन्न वह स्त्रो तसाच भाग हा ecto darm नावाच्या germinal layer पासून निर्माण होतो त्या मुळे पोटातील आजाराचे व्य क्ति करण त्वचे वर आणि त्वचेच्या आजारांचे व्य क्ति करण पोटा मद्धे होते कुज सड हा पुरीषचा स्थायी भाव आहे जो कुष्ठा तही असतो( कुष्णाती वपूहु) त्या मुळे एक मेकांची meds वापरता येतात मिन मिन गद गद मद्धे आम दोष आणि वात विकृती सह tension येण्याने लक्षण वृद्धी दिसते आणि विकृत चेष्टया दिसतात हाच व्याधी घटक अप स्मा राच्या संप्राप्तीत नी rx मद्धे दिसतो  असं अजून खूप विवेचन करता येईल लिहिण्याचा प्रचंड कंटाळा म्हणून कार्य कारण मीमांसा लिहीत नव्हतो पण जे आदरणीय कोल्हटकर गुरुजींनी पेरून वाढवलं ज्याचा स्वतः अनुभव घेतला नी जे श्री नाथ नाडी परीक्षेतून आल तेच लिहून काढलं ( लिहिलं गेलं😊)  या विचारांची एक गंमत आहे हे ऊचार संसर्ग जन्य असतात पुढील माणसात त्या विचारांची ज्योत प्रज्व लित होते आणि खूप रुग्णांना फायदा होऊन आपोआपच जनमानसात आयुर्वेद रुजतो verticle नी horizontal वाढी साठी हे उपयोगी पडेल असे वाटते ,मान नी य श्री सुविनयजी सर म्हणतात तसे हर एक गोष्टी साठी गंथोक्त प्रमाण मागू नये काही गोष्टी या प्रभावानेच काम करतात ( अन्यथा चरकाचार्यानी  naithiki चिकित्सा सांगि तलीच  नसती आणि न जाणो ह्या पद्धतीचे विचार नालंदा ताक्ष शीला वि द्या पिठा मदधील लावलेल्या आगीत जळालेल्या ग्रंथात असतील हि 😊🙏😊)आज रविवार असल्याने जरा जास्तच लिहिले गेले , काही कमी जास्त बोललो / लिहिले गेले असेंल तर माफी असावी 🌹🌹🌹
: 🌹🌹🌹शरीरात कोठेही खटीका  साचल्यास ( calcification) eg रक्तवाहिन्या ,बीज ग्रंथी,बीज वाहिन्या, फुफुसातील पेशी,etcमद्धे तर मुतखडा पाडणारी रस आणि वनस्पतीची meds आणि बस्ति इत्यादी विचार सारणीचाच वापर करावा ,तसेच तिक्त क्षीर बस्ती ,क्षीर कल्याणक घृत बस्ति चा हि उपयोग करावा ,या जोडीला अस्थी मज्जा पाचक हा विषम ज्व रातील कल्प मधा सह वापरावा ,या सर्वामुळे अस्थी धातू चे इतर धातुतील विमार्ग गमन रॉकगले जाते , ca liver मद्धे यकृत हे अस्थी किंवा दगडा प्रमाणे कठीण होते तिथे रक्तामद्धे अस्थी धातूचे विमार्ग गमन असा विचार करून इतर meds सह फार चांगला गुण येतो, रक्त वाहिन्यात cholesterol चे पचन हि या ने चांगलेे होते अंगाला तेल लावून अशा  रुग्णांना सूर्य स्ना न हि द्यावे  h l a b 27 च्या रुग्णा मद्धे सुदधा मास मेदोगत अस्थी धातू गमन असा विचार करून वरील विचाराने अप्रतिम फायदा होतो या वेळी खेकड्याच्या पाठीचे तेल अभ्यंग साठू वापरून कोलादी लेप बाहेरून वापरावा,🌹🌹🌹
 🌹🌹🌹वंध्यत्वामध्ये कोणतेही कारण स्त्री पुरुषांमद्धे निघत नाही अश्यावेळी मूत्र आणि मलाची (  पुरीष) चिकित्सा करावी कारण गर्भाशयाच्या पुढे बस्ती आणि मागे मलाशय आहे  , कोंबडी जसे अंडे उबवितांना त्यावर बसून उष्णता देते त्या प्रमाणेच गर्भाशयातील गर्भ हा पुरिषच्या उष्णतेवर वाढत असतो( पचूनि विष्ठेच्या दाथरी ,,, ज्ञानेश्वरी)  तसेच बस्तीतील मूत्राने अतिरिक्त उष्णतेचे नियमन होते ,या उपचारांसाठी मूत्र विरजण पुरिष विरजण मूत्र रेचन पुरीष रेचंन मूत्रसंग्रहण पुरिष संग्रहण गण उपयोगी ठरतात आणि चिकित्सा फल दाई होते या बरोबरच पाळी पूर्वी प्रजास्थापन गणाचे बस्ती दिल्यास आणखी फायदा होतो.
 🌹🌹🌹स्तन हा शुक्राचा अवयव आहे पुरुष आणि स्त्री वंध्यतवात शुक्र आणि रजो दुष्टी मधील द्रव्यांचा( वातादी कुणप ग्रंथी पुय क्षी ण,,,,) वापर लेपासाठी केल्यास वृषण आणि बीजग्रंथींचे कार्य सुधारते असा अनुभव येतो ,रज ऊर्ध्वगामी होऊन स्तन्याशायची पुष्टी करते तर स्तनावर लेप केल्यास रज गर्भाशय बीजवाहिन्या बीज ग्रंथी etc वर देखील कार्य व्हायला हवे असा विचार करून हे वापरले ,ड्रग administration चा एक नवीन मार्ग यातून मिळाला, eg स्तनात गाठी असतांना ग्रंथी रजच्या द्रव्यांचा लेप स्तनाला लावणे आणि पोटात पण देणे याचा pcod नी fibroid साठी चॅन उपयोग होतो ,या प्रमाणेच शुक्रजंतूं विकृती साठी पण पुरुष स्तन आणि वृषण ग्रंथी वर ती तीे द्रव्य लेपासाठी वापरावीत, या द्रव्यांचा काढा घृत तैल बस्ती नस्य आणि सिद्ध अन्न वंद्यत्वाच्या चिकित्सेला एक नवी दिशा देते इतर चिकित्सेसह या विचाराचाही वापर करून पाहावा🌹🌹🌹
: 🌹🌹🌹गर्भाशयाकडे जाणाऱ्या मज्जा तंतूंचे काम ( ऐच्छिक/अन ऐच्छिक) सुधारण्यासाठी बांबूशूट ,हरिद्रा, वचेचा लेप lumbosacral region वर रोज रात्री करावा, या सह कमल हिम दोन वेळा द्यावा कापुरीमधुरीचा काढा(स्पृक्का) दोन वेळा द्यावा एरंड तेलाचा पिचू पाळीच्याच्या 8,9,10 व्या दिवशी योनी मार्गात ठेवावा याने बीज वाहिन्यात पाणी साचणे ( बीज वाहिनीचे उदर=म्हणून उदरातील द्रवेही स्थान भेदाने वापरावीत) बीज वाहिन्यात अवरोध,pco, गर्भाशयाचा तंतुमय संकोच etcमध्ये खूप फायदा होतो हि चिकित्सा साधारण वर्षभर करावी🌹🌹🌹

🌹🌹🌹सर्व जुनाट विकारात रुग्णाची सर्व लक्षणे विचारून त्याचे वातज पित्तज कफज वात पित्तज इत्यादी लक्षणा मध्ये वर्गी करण करुन  त्यात्या लक्षणांचे ज्वरातील औषध द्यावे eg जर वात पित्तज लक्षणे जास्त असतील तर वात पित्तज ज्वराचे द्राक्षादि हिम हे औषध द्यावे रुग्णाची सर्व लक्षणे 2-3 महिन्यात कमी येतात यासहच वात पित्त कमी करणारे पथ्यही सांगावे ज्वरातीलच meds निवडण्याचे कारण म्हणजे " मनः संताप लक्षण" हेज्वराचे प्रतिनियात लक्षण आहेआणि सर्व व्याधी या psycosomatic असतात सर्व विकार आम आणि अग्निमांदयातून उत्पन्न होतात यासर्ववर ज्वरातील meds च उपयोगी आहेत संधिवात आमवात वातरक्त ग्रहणी अर्श इतकं मोठमोठ्या व्याधीवर हि याप्रकारे छान यश येते सतत काही महिने पथ्य नि meds द्यावी लागतात जुना आजार साधारण जितकीे वर्षे असेल तितके महिने औषध प्रायः द्यावे लागते या प्रकारें च ग्रहणी व्याधीचाही उपयोग जातात येतो यासाठी भै षज्यरतनावली ग्रंथ वापरल्यास वनस्पतिज आणि रस औषधी एकत्र मिळतात खूप लक्षणे सांगणाऱ्या रुग्णात rx कुठून सुरु करावी नी केव्हा थांबवावी हे समजत नसताना हा विचार उपयोगी पडतो यासहच निदान झालेल्या त्या त्या आजाराची व्याधी प्रत्यनिक meds पण वापरावीत कि गुण लवकर येतो🌹🌹🌹
‬: 🌹🌹🌹वातज प्रति श्याय म्हणजे नाकाचा अतिसार , जल शिरशीर्षक म्हणजे मेंदूचे उदर अल्सरेटिव्ह कॉलिटीस  म्हणजे आंत्रचे कुष्ठ,मिंमिन गदगद म्हणजे जिभेचा अपस्मार, असे विचार करून त्या त्या व्याधीची treatment रस आणि वनस्पतिज meds नी केल्यास अप्रतिम फायदा होतो उपचारांची दिशा बदलून आयुर्वेद वेगळा विराट रुपात दिसू लागतो ,🌹🌹🌹